सत्य

संबंध जोडुनीया पेचांत अडकलेले
जवळून पाहिले मी काही दुरावलेले

आश्चर्य वाटले की हृदयांस ना उमगले
झटकून टाकलेले होते स्थिरावलेले

समजून रीत घ्या हो.. अंती जगात असती
पहिले प्रकाश देता.. दुसरे प्रकाशलेले

पाहून रिक्त नजरा.. माझे मला समजले
इतके मला कुणीही नव्हते चितारलेले

आहे प्रकाश ज्याचा.. राहील तोच अंती
विरतील चंद्र सारे एकेक माळलेले