मुक्कामाच्यानंतर

मुक्कामाच्यानंतर साथीदार बदल तू
लांबव थोडी आयुष्या ही छान सहल तू

तुझ्याऐवजी माझ्यावर भाळेन कधी मी
नको मला समजूस फ़ारसा मुसल असल तू

देवळात बसण्यासाठी ना तुला ठेवले
नवीन दे जग देवा, दाखव नवे नवल तू

अशी कशी एकही न माझी खूण उरावी?
मनापासुनी झाड जरासे मनःपटल तू ----------*

लोक बोलती, ऐकावे.... ऐकून हसावे
"चाफ्याचा परिमल तू, ढाक्याची मलमल तू"

एकदाच कर कबूल.... खोटे तर खोटे पण
अजरामरशी सुचव मलाही एक गजल तू 

भोग मागच्या जन्माचे उरकूदे भूषण
या जन्माची पापे सध्या पुढे ढकल तू-----------*