कथा...!

कपोलकल्पित कथा नसावी,
खरेच मजला व्यथा असावी ।

पुन्हा उसासे उशास माझ्या,
युगायुगांची प्रथा असावी ॥

फिरून येती जुनीच गावे,
कशी दिशा या रथा असावी?

तिची नि माझी नवी न ओळख,
नवीन ती अन्यथा असावी ॥

स्वतःच मी बोलतो स्वतःशी,
तशी न चर्चा वृथा असावी ॥