प्रश्न माझ्यापुढे असा आहे...

एकदा वाटते 'बरे' व्हावे
एकदा वाटते तुझे व्हावे

प्रश्न माझ्यापुढे असा आहे
'शेवटी नेमके कसे व्हावे? '

चार खांदे ठरून झाल्यावर
मी स्वतः आपले 'बघे' व्हावे

रोज तू तीच तीच असताना
रोजच्यारोज मी नवे व्हावे?

एकदा वाटते असे व्हावे
एकदा वाटते तसे व्हावे

'चांगली' माणसे जिथे बसली
मी कशाला तिथे उभे व्हावे?

'बेफिकिर' वागणे बरे नाही
पण, कुणाच्यापुढे खुजे व्हावे?