चांदणशेला

ही कुठली शुभंकर वेळा; हा ऋतू कोणता आला?
कुणी देहावर पांघरला जणू हळवा चांदणशेला

ही नवीन वळणे आतूर, गात्रांतून उठली थरथर
हे बावरलेले लाघव, त्या डोळ्यांमधुनी आर्जव
मौनाने पसरून बाहु टिपले हे हसरे मार्दव
आकाशी आनंदाने गहिवरला चांदणशेला

ही निशा जरी सरलेलेली नशा न ओसरलेली
हा भासांचा नव्हता घोळ वा स्वप्नांचाही खेळ
वचने वा आणा- भाका तुटणारच रेशिमधागा
ही सुंदर गंधीत ठेव, हिरमुसला चांदणशेला