कोणती धुंदी चढावी काळजावर..?

कोणती धुंदी चढावी काळजावर..?
ना तसे काळीज उरले धुंदल्यावर...

लढ जसे तू पाहिजे, पण काळजी घे..
आपला फासा न यावा आपल्यावर

'सांगणे त्याने घराणे बंद केले.. '
स्वप्न ही पडतात हल्ली जागल्यावर

बोल तूही जे जसे बोलायचे ते
काय कामाची प्रसिद्धी? झाकल्यावर?

आपले संबंध इतके मोकळे की..,
मोकळे वाटून गेले तोडल्यावर

कोणती शिक्षा न झाली आजही अन
काढले खटले निकाली शेकड्यावर

'ठेवले नाते अजूनी.. जोडलेले.. '
कोणते उपकार झाले आमच्यावर..?