आंधळ्या जगात धक्के चुकवित चालतो मी
शस्त्रांच्या गर्दीत मुंडके वाचवित चालतो मी
मी कोण खरा माझे मलाच कळेना
नित्य मुखवटे नवे वागवित चालतो मी
कधी ह्याची जय कधी त्याचा उदो
रोज ताबूत नवे नाचवित चालतो मी
क्षुद्र बुद्धी माझी अन क्षुल्लक ते ज्ञान
तरी तुणतुणे माझे वाजवित चालतो मी
घेऊन हात रिकामे जरी जाईन मी
कचरा कवड्यांचा तरी साठवित चालतो मी
देणे आरशास नजर शक्य नाही निरंजन
देणे कर्तव्याचे माझे थकवित चालतो मी