पुन्हा नव्याने
अश्रू सजले पुन्हा नव्याने
दुःख उमजले पुन्हा नव्याने
महाल खचले स्वप्नांचे का?
चढवा मजले पुन्हा नव्याने
रुजता इवल्या बीजांमधुनी
वृक्ष निपजले पुन्हा नव्याने
कधी सोयरे, कधी सोय रे
अर्थ समजले पुन्हा नव्याने
लढा स्वतःशी शब्दांनो! मी
मौन परजले पुन्हा नव्याने
-नीलहंस.