थोडस वादळ आणि
आकाशही बरचस ढगाळलेल्
सायंकाळची वेळ आणि
त्यातही थोडस अंधारलेल्
आपली ही पहिलीच भेट आणि
त्यातही मी उशीरा येण्याच दिव्य केलेल् .. .. ..
बराच वेळनंनतर आलो होतो मी आणि
मला पाहतच थबकली होती तू
कापरतच स्मित केले होते मी आणि
स्वतःला सावरत लाजली होती तू
तस ते रोजचच वळण होत आणि
नेमक त्या वळणावर तूझ्या आवडीच
गुलमोहराच झाड होत् .. .. ..
हळूच ढग गडगडले आणि
टपोरे थेंबही बरसू लागले
टपोऱ्या थेंबांनी मला शहारले आणि
गुलमोहराच्या फुलांनी (झाडाखाली) तूला मोहरले
मी वेडा तूझ्याकडे न येता तेथेच थांबलो
तूला अशी फुलांत न्हाहताना पाहतच राहीलो
आता पावसाचा जोर थोडासा वाढला होता आणि
फुलांसोबत थेंबांनीहि तूला स्पर्श केला होता
आपली नजरानजर झाली आणि
दोघांच्याही मनात आगळीच हलचल झाली
तूच काय ? .. ..
मी पण बीथरलो
तू रस्त्यावरती पडणाऱ्या पावसाकडे तर
मी वरती फुलांकडे पाहू लागलो
थोडा वेळ असाच गेला
झाडनांच सळसळन . . ढगांच गडगडन . .
पक्षांच किलबीलन . . पावसाच झरझरण . .
सर्वकाही असूनही . . शांतच गेला
मला पाहताच तूझी आणि
तूला पाहताच माझी . . बत्तीच गुल झालेली
भेटताच काय्-काय बोलायच्
हे मीच काय तूही विसरून गेलेली
अशांत ती शांतता भंगली गेली
दूर कोठेतरी भयाण गडग़डाटासह वीज कोसळली
माझ्या मीठित तू होतीस . . कायची-काय भेदरलेली
सदरा गच्च पकडून . . माझ्या छातीवरती पहुडलेली
काही क्षण असेच गेले
बेभाण असूनही लगेच भान आले .. .. ..
आता माझ्या डोळ्यांत तू होतीस आणि
तूझ्या डोळ्यांत मी होतो
औंठ थरथरत . .तर हृदय् धडधडत होते
अस्वस्थ तू होतीस आणि मी तरी कोठे स्वस्थ होतो
भंगलेली अशांतता शांत होत गेली
मी तूझ्या बोलण्याची तर तू माझ्या बोलण्याची
वाट पाहत गेली . . .
अशातच गच्च मीठि हळूवार सुटत गेली
मी तसाच उभा होतो
तू मात्र थोडिशी बाजूला जावून उभी राहिलीस
मी तेथूनच तूला न्ह्याहाळत होतो
तू मात्र पावसाने भिजलेले . . वाऱ्याने विस्कटलेले
केस सावरत होतीस . . .
त्या फिक्कट रंगात आणि मंद प्रकाशात
तू किती खुलली होतीस्
तशा मुली शालूमध्ये सुंदर दिसतात्
तू तर त्यांपेक्षाहि भिजताना सुंदर दिसत होतीस्
मनात आल . . . तूझ्या कपाळाची दिर्घ चुंबन घावी
थेंब ओघळ्णाऱ्या तूझ्या गालांवरती हळूच खळी खुलवावी
मनात आल . . . तूझ्या औंठांवरती धुंद प्रेमकहाणी लिहावी
धदडधडणाऱ्या हृदयाच्या ठोक्यांची परमोच्च सीमा गाठावी
आता थोडस काळोख पसरत होत आणि
पावसाचीहि संतत धार मंदावत होती
माझ्यात थोडिशी हुडहुडि भरत होती आणि
पानां-फुलांसोबत तूहि नितळत होती
आता आजूबाजूला सर्वच अस्पष्ट होत होत आणि
तरीसुध्धा (तोपर्यंत) खुपकाही स्पष्टच (झाल्) होत्
इतकी वर्ष जे अव्यक्त होत . . माझच काय् ? . .
तूझही माझ्यावरती तितकच नितांत प्रेम होत्
आता निरोपाची वेळ झालेली आणि
माझ्या मनात हरवलेल्या शब्दांनी नुकतीच गर्दि केलेली
तेव्हा अचानक तूझ्या डोळ्यांतून गंगा-जमुना ओसंडून वहिलेली
तुला अशी विरघळताना पाहून . .
. . . माझी केवढी टरकलेली
तशी तू थोडाच वेळ रडलेली पण . . .
तोपर्यंत शेकडो विचारांनी माझ्या मनात बूडी मारलेली
शेवती गळाला लागला एक प्रश्न . .
"एवढया प्रतिक्षीलेल्या क्षणी . . तू का अशी रडवेली?"
इतक्यात तू अडखळतच पुढे सरसावली
पहिल्याच भेटीत शेवटची अशी पहिलीच चिठ्ठी दिली
"येशील तू . . . याच वळणावर . . . याच वेळी
पण मूळीच थांबू नकोस माझ्यासाठी . . या झाडाखाली
कारण . . . होते मी तूझीच
झालेही असते तूझीच सखी
पण काय सांगू राजसा
ही मॅना आता नाही राहिली तूझी . ."
खिश्यामध्ये चिठ्ठी खोचत
मी तुला आसपास शोधिली
तू मात्र तोपर्यंत धावत . .
दाबलेला हुंदका सोडत . . दूरवर गेलेली
मी मात्र तेथेच तसाच स्तब्ध राहिलो
ढबढबलेल्या डोळ्यांनी तूझ्याकडे पाहतच रहिलो
मलाच कळेना . .
पायाखालची जमीन सरकूनही मी स्थीर कसा राहिलो
ओथंबलेल्या भावना कागदावरती सांडूनही . . .
"अव्यक्त" मी असा अव्यक्तच् राहिलो
.. .. .. .. "अव्यक्त" मी असा अव्यक्तच् राहिलो
.. .. .. अव्यक्त .. .. ..