जरा डोळ्यांना सांग बरे, म्हणावे, नेम न चुकावा
मजा ही काय १, भाव न
भाव तव घातक वाटत जावा ।ध्रु।
असे युग हे तुझे, वाटेल त्याचा जीव तू घ्यावा
जरासे ऐक माझे, तू असा ना खेळ खेळावा
तुझ्या, नकळे, खट्याळपणामुळे कोणा मृत्यू यावा ।१।
जरा डोळ्यांना सांग बरे ...
निरागसता, खट्याळपणा नि मोहकता तुझी भारी
कशासाठी हवे तुज बाण वा खंजीर, तलवारी?
नयन रोखुन पहाशिल तो स्वतःच स्वतः मरुनी जावा ।२।
जरा डोळ्यांना सांग बरे ...
जरा रागव वसंताला कटाक्षांच्या मधे येतो
जरा रागव समीराला ग कुंतल विस्कटुन जातो
असे न घडो, कुणी यावा तुझे मनही घेउन जावा ।३।
जरा डोळ्यांना सांग बरे ...
टीपा :
पर्याय : १. मजा बघ काय, भाव न भाव तव घातक वाटत जावा
वृत्त लगागागा लगागागा लगागागा लगागागा ... असे जरी असले तरी ध्रुवपदाच्या आणि कडव्यांच्या शेवटच्या ओळीत शेवटच्या लगागागा ऐवजी गागागागा असा फरक मूळ गाण्यात केलेला आहे. ( .... बरोब्बर! भाषांतरातही मी तसाच बदल केलेला आहे ) ध्रुवपदाच्या पहिल्या ओळीतल्या दुसऱ्या लगागागा ऐवजीही गागागागा आहे. (मूळ गाणे आणि भाषांतर दोन्हीत.)
हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.
चाल : मूळ गाण्याचीच! (लगागागा लगागागा लगागागा लगागागा) (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल )
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)
३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ... आवा असे जमवा बरका! यमकाची जागा ठळक केलेली आहे.