एकल्यास नाही सूख, एकल्यास नाही दु:ख..
एकाच मनाची रुपं, परी सापेक्षांतर खूप..
मन आल्हादित ही होते, मन दुःखातूर ही होते..
मी त्रयस्थ आहे कोणी, जग मिथ्या मज भासते..
मनात मी ना वसते, तनात ही ना असते..
गात्रांतून शोधू जाता, का कुठेच ना गवसते..
या राग लोभ जाणीवा, ज्या मनास रेखून जाती..
निर्बोध मनाची कवने, ते शब्द गळ्यातून गाती..
मज कुणी पाहीले नाही, मज कुणी ऐकीले नाही..
परी आहे मज अस्तित्व, जे कुणी स्पर्शीले नाही..
आहे कुणी मी तिसरी, जग मज आनंदे विसरी..
मी आहे नीज चैतन्य, पवन जसा बन्सरी...