प्लॅस्टिकची कविता


प्लॅस्टिक पिशव्यांनी आवळला फास,
मुंबईचा त्यांनी घेतला घास.
आता तरी तोडू सवयीचा पाश,
निसर्गाला घेता येईल मोकळा श्वास.
      आपलीच खोड आपल्याला नडली,
       नाले-गटारे पिशव्यांनी तुंबली,
       असती थोडी जर शिस्त पाळली
       वेळच अशी मग आली नसती.
प्लॅस्टिकने जातो जमिनीचा पोत,
पिशव्या खाऊन गुरांचे बिघडते पोट
पर्यावरणास पोचते गंभीर चोट,
सर्वांनी करू पॉइंट हा नोट
       आठवू जुना प्लॅस्टिकविरहित अध्याय,
       कागद-कापडाचा आहे उत्तम पर्याय,
       रोजगार वाढेल होणार नाही अन्याय
       सो इज देअर एनी रिझन टू क्राय?

-मंदार