शिष्टांस मान्य येथे पाण्यात जग पहाणे
'संमेलनात' आता आडून वार होणे
'हलकेच घ्या' म्हणूनी करतात वार गहिरे
तलवार शब्द ज्यांचे त्यांना म्हणा शहाणे
कोड्यात सांगणे अन कोड्यात ऐकणेही
चेंडू, घड्याळ , मासे भेंड्या, तसे उखाणे
(भाषांतरास आले दिन आज सोनियाचे
स्वप्नील वास्तवाचे खोटेच दुःख गाणे)
विद्वान दुराग्रहाने पंडित प्रदर्शनाने
ज्ञानी बाहुबलाने जगतास मान्य होणे
मिसळीत दंग साऱ्या राहू दे जगताला
कुल्फीला गोरसाचे प्रिय गार गोड लेणे
--कुल्फी
(९.७.०६)