हे नीलकंठा,
ये पृथ्वीतलावर आणि पहा जरा
इथे कसं 'हलाहल' झालय 'अमृत'
आणि आमचे 'देव' आणि 'अप्सरा' विकताहेत
विविध आकाराच्या चषकातून
लाल,काळ्या रंगाच फेसाळ,चवदार हलाहल
आणि
आम्ही पाजतोय ते विष
आम्हीच जन्म दिलेल्या बाळांना
अन् वर देतोय आशीर्वाद
'औक्षवंत व्हा, बाळांनो!'
'औक्षवंत व्हा' !
(जयन्ता५२)