आज हिंदी चित्रपट क्षेत्राचा पसारा प्रचंड वाढलेला दिसतो पण त्यात अभिनयाचे क्षेत्र सोडल्यास इतरत्र स्त्रियांचा सहभाग तुलनेने नगण्य दिसतो असे का?उदाहरणार्थ संगीतकार म्हणून लक्षणीय कामगिरी बजावणारी एकमेव स्त्री उषा खन्ना दिसते.त्यापूर्वी फार पूर्वी सरस्वती या नावाची संगीतदिग्दर्शिका झाल्याचे दिसते. आनन्द घन या नावाने श्रीमती लता मंगेशकर यानी काही मराठी चित्रपटाना संगीत दिल्याचे दिसते,बाकी एकही नाव दिसत नाही. जे संगीत दिग्दर्शनाच्या बाबतीत तेच निर्मिती, दिग्दर्शन,संकलन या इतर क्षेत्रातही दिसते.याला काय कारण असावे? मराठीतही स्मिता तळवलकर आणि आताशा स्मिता ठाकरे यांचा सहभाग दिसतों नाट्य क्षेत्रातही एक लता नार्वेकर यांचा अपवाद वगळता निर्मिती क्षेत्रात ठळक दिसणारे नाव आठवत नाही. चित्रकार म्हणूनही फारच कमी स्त्रिया नावाजलेल्या दिसतात.स्त्री ही कलांची जननी समजली जाते पण सर्वच कलाक्षेत्रात ती अभावानेच दिसते असे का? कदाचित माझे हे अज्ञानही असू शकेल की बऱ्याच स्त्रिया क्लाक्षेत्रात भरघोस कामगिरी करत असून त्यांची माहिती मला नाही.मनोगतींनी ते दूर केले तरी आनंदच वाटेल .