शब्दांच्या पलिकडले.....! या माझ्या संग्रहित काव्य पंक्तींच्या सादरीकरणानंतर त्यातील एका चुकलेल्या शब्दावर कांही मनोगतींनी जो तात्काळ प्रतिसाद दिला तो स्तुत्त्यच आहे. मराठी बध्दलची जागरुकता आणि जाण प्रशंनीय आहे. आता खाली, एका जुन्या कवितेच्या दोन ओळी देत आहे. त्या तंतोतंत नसतीलही.जाणकारांनी त्यामधील शुध्दता सांगावी आणि अर्थही सांगावा. विनंती.
हस्ति हस्तिन्द्रायुध, नारीपति-मृगान्तकमुखरिपु चे नाम पूर्वार्ध नाही I
त्या लागी क्षमासुतैषारिपुअनुजप्रिया स्वल्पही येत नाही II
हे काय आहे तें ' शब्दांच्या अलिकडेच ' राहून शोधा.
चुभुदेघ्या, कलोअहीवि,
गानवेडा.