छोटे किस्से-१

[रोजच्या जीवनात  काही मजेशीर किस्से घडतात. माझ्या अनुभवातले काही किस्से मी इथे लिहिणार आहे]


साधारण दुपारची वेळ होती. मी गणिताचा क्लास करून माझ्या मैत्रीणी कडे जायला निघाले होते! वाटेत जोशी वडेवाल्यांकडून मस्त पैकी दोन वडे घेतले.[मला एक कधीच पुरत नाही.. ]


रमत गमत, इकडे तिकडे बघत चालले होते! तेवढ्यात समोरून एक तुडूंब भरलेली, ओथंबून वाहणारी बस आली. माझं लक्ष त्या पाटीकडे गेलं. आणि बटाटा वड्याचा तो घास घशात अडकला. पाटी होती : '१५६ देहदर्शन'. भर दुपरी पुण्यात ही बस?


 जरा नीट पाहिलं मग लक्षात आलं "देहूदर्शन" होय. मग ठीके!! स्वतःशीच हसत मी परत एकदा वड्याचा आस्वाद घेत चालू पडले!