आजार

मांडला देवळांचा बाजार होता
पाहिला देव मी लाचार होता


केला जरी सूर्य काबीज त्यांनी
राहिला त्यांच्या मनी अंधार होता


बदलले ना वागणे फुलांचे माझ्या
काट्यांचा जरी त्यांना शेजार होता


करून इथे पापे दिवसा उजेडी
चेहरा त्यांचा पुन्हा निर्विकार होता


भोवताली सर्व माझ्या ठार बहिरे
अन मला बोलण्याचा आजार होता


                        - अनिरुद्ध अभ्यंकर