कळत नाही जगावे कशाला?
आसवेच भरती रिक्त प्याला
व्यर्थ उल्केपरी निखळतो मी
भान नसते तुझ्या चांदण्याला
मरण दररोज सांगून जाते-
अर्थ नाही इथे गुंतण्याला
छंद जडतोच दु:खे पिण्याचा
का विषाची चटक ह्या घशाला?
रक्त काट्यातुनी दर्वळावे
जखम व्हावी कळीच्या मनाला
पापणीला तडे वास्तवाचे
स्वप्न जळते तमाच्या उशाला.