![]() |
उत्तर प्रदेशातील आजमगढ जिल्ह्यात एका जमीनदाराच्या घरी कैफी आझमीचा जन्म झाला. नातेवाईकांच्या हट्टामुळे धार्मिक शिक्षणासाठी लखनौच्या सुलतान-अल-मदरिस मध्ये दाखल व्हावे लागलेल्या कैफीला त्याच्या बंडखोर स्वभावामुळे तिथून हाकलून देण्यात आले. त्यानंतर लखनौ व अलाहाबाद येथून कैफीने अरबी, फार्शी आणि उर्दूचे शिक्षण घेतले. वयाच्या अकराव्या वर्षापासूनच शायरी करणाऱ्या कैफीची पहिली गझल गायली होती ती गझलसम्राज्ञी बेगम अख्तर यांनी. मार्क्सवादाचा पुरस्कार करणाऱ्या कैफीने आपले नंतरचे आयुष्य कम्युनिस्ट पार्टीला वाहून टाकले होते. पार्टीचे हे काम करत असतानाच त्याच्यातला संवेदनशील शायर उत्तमोत्तम रचनांची निर्मिती करत राहिला. |