![]() |
'क्रिस्टिना नोबल' ह्या आयरिश स्त्रीने तिच्या वयाच्या पन्नाशीपर्यंतच्या आठवणी 'अ ब्रिज अक्रॉस माय सॉरोज्' ह्या नावाने प्रसिद्ध केल्या आहेत. ह्या पुस्तकाला काही साहित्यिक मूल्य वगैरे आहे असा कुणाचा दावा नाही. पण ते कुठेतरी खोल परिणाम करणारे तर आहेच, तसेच तिचे स्वतःच्या ध्यासाने झपाटलेपण व त्यातून अल्प काळात उभी राहिलेली तिची संस्था हे सर्वच अद्भुत व खूप प्रेरणादायक आहे. त्या पुस्तकाची व क्रिस्टिनाच्या व्यक्तिमत्त्वाची ही ओळख.
[ 'A Bridge Across My Sorrows' Christina Noble with Robert Coram. Corgi Books 1994. ISBN 0-552-14288-3]. |