किति छान दिसशी तू

नायक किति छान दिसशी तू । किति सुंदर दिसशी तू

नायिका सांग पुन्हा ... सांगत ऱ्हा ... खूप बरे वाटे
आता आयुष्यातिल स्वप्न नि स्वप्न खरे वाटे

नायक किति छान दिसशी तू । किति सुंदर दिसशी तू

नायिका करशील प्रशंसा कुठवर ... रे कुठवर?
नायक धमन्यांतुन ह्या रक्त वाहते जोवर ... गं जोवर
नायिका कुठवर राहीन मनात ... रे मनात?
नायक जोवर उगवे सूर्य निळ्या गगनात ... गगनात

नायिका सांग पुन्हा ... सांगत ऱ्हा ... खूप बरे वाटे
आता आयुष्यातिल स्वप्न नि स्वप्न खरे वाटे

नायक किति छान दिसशी तू । किति सुंदर दिसशी तू
प्रेमाहुन प्रियतम तू । गं प्राणसखी मम तू

नायक खुश असशी ना मज वरता? ... मज वरता?
नायिका सागर मिळता, राहिल कोठे सरिता? ... रे सरिता
नायक करु काय अधिक तुजसाठी? ... तुजसाठी?
नायिका जन्मोजन्मी हो तू जीवनसाथी. ... हो साथी.

नायक सांग पुन्हा ... सांगत ऱ्हा ... खूप बरे वाटे
नायिका आता आयुष्यातिल स्वप्न नि स्वप्न खरे वाटे

नायक किति छान दिसशी तू । किति सुंदर दिसशी तू

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा.

२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत. (मागच्या खेपेलेआ काही लोकांचा गैरसमज होऊन त्यांनि विनंती करून सुद्धा व्यनितून उत्तरे पाठवली.  )

३. प्रशासक, प्लीज, मागच्या वेळेप्रमाणेच बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील  )

४. फक्त गाणे ओळखू नका. काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. आपल्या प्रियव्यक्तीच्या सोबत मूळ चालीत म्हणून पाहा.