मध्यरात्री दाटले घन

मध्यरात्री दाटले घन, नीज झाली वैरिणी
                        काय करु, सांगा कुणी
मध्यरात्री दाटले घन, नीज झाली वैरिणी

सर्व दारी दीप जळती जीव माझ्या अंगणी
पवन वाटे सूळ, मारी टोमणे ही ओढणी
सांगु कोणा मी मनोगत? नीज झाली वैरिणी
                        काय करु, सांगा कुणी
मध्यरात्री दाटले घन नीज झाली वैरिणी

भंगली स्वप्ने सकल, आशाहि गेली सोडुनी
मन तहानेले, जरी गोदावरी डोळ्यांतुनी
पूर लोटे आसवांचा, नीज झाली वैरिणी
                        काय करु, सांगा कुणी
मध्यरात्री दाटले घन नीज झाली वैरिणी

-----------------------------------
धावत्याला शक्ति येई आणि रस्ता सापडे
                भ्रांत तुम्हा का पडे
... ह्या चालीत गा !
-----------------------------------

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा.

२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत. (मागच्या खेपेलेआ काही लोकांचा गैरसमज होऊन त्यांनि विनंती करून सुद्धा व्यनितून उत्तरे पाठवली.  )

३. प्रशासक, प्लीज, मागच्या वेळेप्रमाणेच बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील  )

४. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.) ... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )