राष्ट्राध्यक्षा ?

  रविवारच्या टाइम्स ऑफ इंडिया मध्ये श्री‍ जुग‌ सरैया यानी ` राष्ट्रपती,पत्नी ऑर वो ` या शीर्षकाखाली  श्रीमती पाटील या राष्ट्रपतीपदावर नियुक्त झाल्यास त्याना कोणत्या प्रकारे संबोधावे याविषयी बरेच काही लिहून राष्ट्रपत्नी , राष्ट्रमाता असे काही पर्याय देऊन स्वत: च ते पर्याय कसे अयोग्य आहेत असे दाखवले आहे. ते वाचून असे वाटले की `प्रेसिडेंट` या शब्दाला ` राष्ट्राध्यक्ष ` हा आणखी एक पर्याय आहे आणि स्त्री राष्ट्राध्यक्ष झाल्यास तिला "राष्ट्राध्यक्षा" असे संबोधता येईल ही गोष्ट त्यांच्या का लक्षात येऊ नये ? श्री‌. सरैया यानी पुढे जाऊन श्रीमती हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षा झाल्यास त्याना मिसेस प्रेसिडेंट्रिक्स म्हणावे लागेल असाही मुद्दा उपस्थित केला आहे.  
   त्याचबरोबर आणखी एक विचार मनात आला की जेव्हा श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या त्यावेळी त्याना काय म्हणावे हा प्रश्न कसा उपस्थित झाला नाही ?
   त्या अनुषंगाने  असाही विचार मनात आला की सर्वच भाषांमध्ये पदे दाखवणारे पंतप्रधान. मुख्यमंत्री, अध्यक्ष ,संचालक, पालक, मालक, चालक इ.शब्द पुरुषप्रधानच आहेत का /असावेत का?.पंतप्रधान,मंत्री या काही शब्दातून ती व्यक्ती पुरुषच असावी असा बोध होतो असे वाटत नाही.मनोगतींना काय वाटते ?