तरूण सुशिक्षित बेकारांसाठी

अनेक सुशिक्षित तरूण नोकरी नाही,म्हणून बेकार आहेत.काही अल्प मोबदल्यावर ,कसलेही काम करताना दिसतात.काही तरूण वाममार्गाकडे वळतात.त्यानी एकत्र यावे.आपली बुद्धिमत्ता वापरून समाजातील वाईट,भ्रष्टाचारी अधिकारी,पुढारी यांच्यावर धाक निर्माण करावा्.हे काम तसे अवघड नाही. ग्रामपंचायत,पालिका,जिल्हा-परिशदा येथे चालणाऱ्या कामामध्ये भ्रष्टाचार होत असतो.बाजारभावापेक्षा चढ्या भावात खरेदी केल्याचे दाखवून ,व्यापाऱ्यांशी संगनमत करून प्रत्यक्ष मालाची खरेदी न करता,खोट्या नोंदी नोंदवह्यामध्ये करून शासकिय रकमां हे अधिकारी व त्या त्या संस्थेचे पदाधिकारी वाटून घेत असतात.याबाबत त्या त्या आर्थिक वर्षानंतर लेखापरीक्षणात याबद्दल कधी कधी लिहिले जाते.लेखा परीक्षण करणारे भ्रष्ट असतील तर अशा बाबी उघड होत नाहीत.वेगवेगळ्या खात्यामध्ये वेगवेगळ्या प्रकाराने भ्रष्टाचार केला जातो.आता सामान्य नागरिकांना ही माहितीचा अधिकार प्राप्त झाल्याने मूळ।सुधारित अंदाजपत्रके,त्यानुसार झालेला खर्च,प्रत्यक्षात झालेले काम यावरून भ्रष्टाचार झाला किंवा कसे हे निश्चित करता येईल.  असे भ्रष्टाचार शोधून संबंधित नेते व अधिकारी यांचेवर कारवाईचा आग्रह धरून भ्रष्टाचार निपटून काढण्याचे काम तरूण सुशिक्षित बेकाराना करता येईल त्यासाठी त्या त्या खात्यातील सेवानिवृत्त जेष्टांची मदत नक्कीच मिळू शकेल.गावा-गावातील,शहरा-शहरातील सुशिक्षित बेकार तरुणानी हे स्वयंघोषीत स्वतंत्र काम जर हाती घेतले तर भ्रष्टाचार निर्मूलनाचे बरोबरच बेकारी निर्मूलन होऊ शकेल.

मग बेकार सुशिक्षित तरूणानो ,तुम्हाला पटतोय का हा विचार ?