भेळ

  • चुरमुरे
  • फरसाण, भाजलेले दाणे
  • बारीक चिरलेला कांदा, लाल टोमॅटो, कोथिंबीर व कैरी
  • लाल तिखट, धनेजीरे पूड, मीठ, साखर
  • चिंचगुळाचे दाट पाणी
  • बारीक शेव,
१५ मिनिटे
ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात

चुरमुरे, फरसाण, बारीक चिरलेला कांदाटोमॅटो व कोथिंबीर, भाजलेले दाणे व चवीप्रमाणे लाल तिखट, धनेजीरे पूड, मीठ व चवीला थोडी साखर घालून हे सर्व मिश्रण एकत्रित करून डावेने व्यवस्थित ढवळणे. झाली भेळ तयार. वाढताना त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर व बारीक शेव पेरून द्या. आवडत असल्यास चिरलेली कैरी  चवीपुरती घाला. एक वेगळेपणा म्हणून भेळ खाताना स्टीलच्या चमच्याऐवजी पाणीपुरीच्या पुरीचा वापर करा.

नाहीत.

स्वानुभव