भागो भूत आया...!!!

गेल्या गुरुवारी रात्री "आज तक" ह्या चॅनल वर "हमने भूत देखा" नावाचा खास कार्यक्रम दाखवला गेला..... त्यात लोकांनी आपले भूत पाहिल्याचे अनुभव त्यावर चर्चा आणि काही व्हिडिओ क्लिप्स अशा काही गोष्टी दाखवल्या.... तो कुणी कुणी पाहिला? मला त्यातल्या काही क्लिप्स आणि फोटो आठवत आहेत....devil

१. एका माणसाच्या घरातील एक दार आपोआप उघडते.... आता ह्याला काहीही कारण असू शकते पण परिस्थिती ही हवेने दार उघडते, करकर आवज करते, किंवा जरा सैल बिजागय्रा असल्याने उघडते अशी नसल्याने त्या घरातील लोकांनी आज तक चॅनल वाल्यांना बोलावले..... त्यांनी तिथे काही अंतरावर कॅमेरा लावला .... द्रुश्य तसे भयानकच होते.... हॉटेल च्या दाराला लॉक चा गट्टू असतो तसा गट्टू असलेले दार....दार खडखड करते.... तो गट्टू भयंकर प्रकारे हलत आहे..... दार उघडते... मागे कुणीनाही..... तरीही गट्टू खडखड हलतोच आहे सोबत भयानक आवज..... परत दार लावले तरी तेच.....

२. एका कपाटाचे दार..लाकडी ते बंद केले तरी उघडते,,,, आणि एका भयानक बाईची आकृती त्या दारात दिसते....

३. एक शाळेतील मुलांचा फोटो.... पण एका मुलीच्या हाताच्या बाजुला एक जळका हात दिसतो...

४.एका मुलाने नवीन शर्ट घालून काढून घेतलेला फोटो.... त्याच्या मागे एका केस मोकळे असलेल्या बाईची आकृती.....

५.एक मोठा डबल बेड.... बसलेले कुणीही नाही पण एक व्यक्ती झोपल्यासारखी आकृती दिसते.....

ह्या सगळ्याचे विश्लेशण करायला २ डॉक्टर बसलेले...पण फोन करणाय्रांनी त्यांना असे प्रश्न विचारले की ते काहीही उत्तर देउ शकले नाहीत...

ह्या बद्दल मी सुद्धा काही ऐकले आहे...

१. मी मुळात मुंबई ची... रात्रीच्या एका लोकल मधून लास्ट लेडिज मधून एके काळी एक मुलगी पारसीक च्या बोगद्यात (ठाणे ते डोंबिवली प्रवासात फास्ट ट्रेन ने जाताना जो मोठा बोगदा लागतो तो)पडली... असे म्हणतात की आजही त्याच ट्रेन मधून त्याच जागी ती मुलगी उडी टाकते....ते हि रोजsurprise

२.पुण्यात कॅंप मध्ये अरोरा टॉवर्स च्या आसपासच्या कोणत्यातरी गल्लित म्हणे एक हाँटेड हाउस आहे... मी पाहीले नाही.... पण पडकी ओसाड जमीन तिथे एक पडके जुने घर ...बंगलाच.... आहे..... भयानक दिसतो तो असे सगळे म्हणतात.... अनेक बिल्डर लोकांनी ति जागा घेउन अनेक यज्ञ, शांती करायचा प्रयत्न केला पण काही फरक पडला नाही....liar

तुम्हाला काय वाटते...... हे भूत.... ब्रम्हसंबंध, मुंजा, प्लँचेट ह्या सगळ्याबद्दल तुम्हाला काय माहीती आहे? आजतक ने हे जे दाखवले ते कितपत सत्य आहे???thinkingतुमचे मत आणि तुम्हाला असलेली माहीती अपेक्षित आहे....

धन्यवाद.