पुस्तकप्रेमींसाठी नवे दुकान

     पुण्यात पुस्तकप्रेमींसाठी दुकाने, दालने बुधवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ, डेक्कन जिमखाना या पारंपरिक परिसरातच एकवटलेली आहेत. पुणे शहर वाढत गेलं आणि या परिसरातील रसिक बिबवेवाडी, सहकारनगर, धनकवडी, सातारा रोड, सिंहगड रोड, कोथरूड, औंध, विद्यापीठ परिसर या भागात विसावले. इतर सर्व प्रकारची दुकाने या परिसरांमध्ये निर्माण झाली पण पुस्तकांची अपवादानेच तयार झाली. अजूनही पुस्तक खरेदीसाठी या पारंपरिक ठिकाणीच रसिकांना यावे लागते.
    समुत्कर्ष या नावाचे पुस्तकांचे एक दुकान कर्वेनगर परिसरात सुरू झाले आहे. अभय थिटे यांचे हे दुकान असून कला विषयक पुस्तकांवर थिटे यांनी भर दिलेला आहे. साहित्यविषयक पुस्तकेही आहेत. इतर विषयांवरील पुस्तकेही आवश्यकतेनुसार मागवून घेतली जातात. 
    कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रोड या परिसरातील पुस्तकप्रेमी जनतेसाठी हे दुकान निश्चितपणे उपयुक्त आहे.
    पत्ता असा -
    दुकान क्र.६, विट्ठल प्लाझा, वनदेवी मंदिरासमोर, वडाचा स्टाप, कर्वेनगर, पुणे- ४११०५२ 
    दूरध्वनी - दुकानाचा (०२०)२५४५१४९२   
               घराचा    (०२०)६५२७३८४६
(कोथरूडकडून वारजेकडे जाणा या रस्त्यावर डहाणूकर चौक मागे टाकला की डावीकडे उंचवट्यावर सहवास सोसायटीकडे जाणारा एक उतरता रस्ता लागतो. हा रस्ता जिथे सुरू होतो तिथे जवळच विठ्ठल प्लाझा ही इमारत आहे.)