नायक : |
सर्वांगामधे विषार पसरला विंचु चावला (ग मला) विंचु चावला। |
नायिका : |
ठणका न झाला कमी, वाढला विंचु चावला (र मला) विंचु चावला ।ध्रु। |
नायिका : |
खुणावून दुष्टा - साधलास कावा काय घेतलास हा - चिमटा की चावा? काळा निळा व्रण पहा उमटला विंचु चावला (र मला) विंचु चावला ।१। |
|
|
नायक : |
केलेस काल जे - पुन्हा एकवार कर दुखण्यावर माझ्या - औषधोपचार कर पडतो पाया - वाचव मला विंचु चावला (ग मला) विंचु चावला ।२। |
|
|
नायक : |
डुलतात कलिका - वाऱ्याच्या संगे |
नायिका : |
गुणगुणती भवती - खोडकर भुंगे |
नायक : |
आला वसंत ... |
नायिका : |
आला वसंत आणि शिशिर संपला विंचु चावला (र मला) विंचु चावला ।३। |
चाल : मूळ गाण्याचीच! (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल
)
कोळीगीताची आठवण व्हावी अशी ढिक्किटाकी टिक्किटाकी अशा ठेक्यात बसणारी चाल.
ध्रुवपद आणि कडव्याची शेवटची ओळ : गालगालगा (ललगा) गालगालगा
इतर ओळी : गागागा गालगा - गागागा गालगा
चाल सैल आहे त्यामुळे खेमट्यात बसेल इतपत पाच / सहा मात्रांचे गट दिसतात.
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे
शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका
काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)