आम्हा न क्रौर्य आले

आम्हा न क्रौर्य आले
तिजला न प्रेम आले
मन वाहिले शिळेसी
अन घाव त्या मिळाले..... ॥ धृ ॥

आमुच्याच हृदयापायी
झालोय नष्ट आम्ही
कोणाकडे हो गावे
गाऱ्हाणे, ना कळाले ॥  १ ॥...... आम्हा न...

हे विश्वनिर्मिका रे
पुसतोय मी तुला रे
हा द्रोह का मिळाला?
प्रतिप्रेम का न आले? ॥  २ ॥....... आम्हा न...

विनंतीः

हे कोठल्या गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखावे.