परक्यांकडे डोळे ना लावुनी पहावे

भाग १.

नायक :

परक्यांकडे डोळे ना लावुनी पहावे
परक्या जनांना लागे एक दिन जावे ।ध्रु।

रम्य ऋतू हा येतो जेव्हा
काहिनकाही घडते तेव्हा
घडे काय आता यंदा बघावे
परक्यांकडे डोळे ना-------

परक्यांस येथे पक्षी म्हणती
वसती रात्री दिवसा उडती
आज इथे अन तिथे उद्या जावे
परक्यांकडे डोळे ना-------

बाग फुलांनी बहरे जेव्हा
रसिक जमती हे तेव्हा तेव्हा
दिन शिशिराचे हे कैसे सरावे
परक्यांकडे डोळे ना-------

भाग २.

नायिका :

गोष्ट हीच मीही केली होती
परक्यावरी एका केली प्रीती
पतंगापरी हे हृदय जळावे
परक्यांकडे डोळे ना-------

माहेराहून घेउन येती
गावातून परगावी नेती
सांगून काही ना  ह्यांस पटावे
परक्यांकडे डोळे ना-------

भाग ३.

नायक :

प्रेमाने हे होती न अपुले
रडती न हे दगडाचे बनले
कुणी यांजसाठी ना अश्रू वाहावे
परक्यांकडे डोळे ना-------

ना हे ढग वा ना हे तारे
कागद कुसुमा सम जो तो रे
फुलांनी न ऐशा बाग फुलवावे
परक्यांकडे डोळे ना-------

गोष्ट हीच मीही केली होती
परकीवरी एका मी केली प्रीती
हृदय सांगते वेडे कारुण्यभावे
परक्यांकडे डोळे ना-------

हे कुठल्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखावे. गाण्याचा मुखडा मुद्दाम दिलेला नाही तो काही दिवसांनंतर देईन.

ह्या गाण्यत आणखी भाग आणि कडवी आहेत तीही नंतर देईन.