वैद्यकीय उपकरणे व त्यांचे उपयोग


अंतर्दर्शन (एंडोस्कोपी)
(शरीरातील अंतर्भागाची दूर्बीणी ने तपासणी.)


शरीरातील अंतर्भागाची पूर्ण तपासणी करण्या साठी व आवश्यकता पडल्यास उपचार करण्यासाठी अंतर्दर्शक (एंडोस्कोप) या यंत्राचा उपयोग केला जातो.


ह्यात मुख्यत्वे दोन प्रकार असतात = कडक व लवचिक


कडक हया प्रकारची यंत्रे साधरणतः शल्य चिकित्सक हर्णिया, ऍपैंडीक्स यां सारख्या किंवा स्त्रियांच्या गर्भ संबंधीत रोग निदानात वापरतात. तर लवचिक ह्या प्रकारच्या यंत्रांचा वापर पोटाचे,लहान किंवा मोठ्या आतड्यांचे विकार,जठराचे विकार वगैरे,गुद्-द्वार व त्या मार्गांचे विकार यासाठी वापरले जातात.


ह्या भागात आपण एंडोस्कोपी ह्या विषया संदर्भात थोडी तांत्रिक माहिती घेऊया.


दुर्बिणी सारखी संरचना असणाऱ्या या यंत्रातून प्रकाशवाहक काचतंतूंचा (काचें पासून बनवलेले रज्जू) वापर केल्याने पलीकडील प्रतिमा सुस्पष्ट बघता येते. ही शरीराचा आतील भागातील प्रतिमा बघून शरीराच्या पोकळीत असणाऱ्या अवयवांचे रोग निदान करते.


रोग निदान करण्यात येणाऱ्या पोकळीत अंधार असल्याकारणाने ती प्रतिमा दिसण्यास अडथळा येऊ शकतो म्हणून हॅलोजन प्रकाशाच्या माध्यमाचा प्रखर किरणझोत ह्या यंत्रातून सोडण्याची व्यवस्था केली आहे. ही व्यवस्था प्रकाश स्रोत (लाइट सोर्स) नावाच्या अतिरिक्त जोडणी मार्फत केली जाते. रोग निदानासाठी पोकळीत हवा भरून पोकळीचा आकार मोठा केला जातो. ज्यामुळे अंतर्दर्शकाची शरीराचा पोकळीच्या आतील हालचाल सुलभ रितीने होऊ शकते.(रोग निदान झाल्यानंतर, ही हवा खेचून काढण्यात येते.)


पोकळीच्या आतील भागाचे निरीक्षण सुलभ रितीने होण्यास मदत व्हावी व नको असलेल्या द्रव पदार्थामुळे तपासणीत अडथळा येऊ नये म्हणून एंडोस्कोपला असणाऱ्या शोषण वाहिनीमार्गे (सक्शन चॅनल) हा नको असणारा द्रव पदार्थ बाहेर खेचून काढण्यात येतो. ह्यासाठी शोषक पंप (सक्शन पंप) हे यंत्र वापरण्यात येते.


अडकलेली किंवा लहान मुलांनी गिळलेली पिन,क्लिप,बटण वगैरे किंवा प्रयोगशाळेत पाठवावा लागणारा आतड्याच्या आतील छोटासा तुकडा (बायोप्सी) शोषण वाहिनीच्या मार्गिकेतूनच एका छोट्या चिमट्याने काढता येतो.


एंडोस्कोपी ही अत्यंत सोपी उपचार निदान पद्धत आहे. त्याची अजून जास्त माहिती मी हळूहळू येथे आपल्या सदस्यांसाठी देईनच.


हि माहिती देत असताना अनवधानाने किंवा माहिती नसल्याकारणे काही इंग्रजी शब्द जसेच्या तसे लिहावे/द्यावे लागत आहे त्याबद्दल क्षमस्व


माधव कुळकर्णी -


(माकु९६३)