(ठेव दरवाजा खुला...)

आमची प्रेरणा  भूषण कटककर यांची रचना  ठेव दरवाजा खुला...  

पाडली आहे गझल, जी समजणे अवघड तुला
ठेवली मुद्दाम आहे  मी अलामत ही 'उ' ला

मी कसा वाईट ठरलो, सांगतो आता तुम्हा
(गोपिनाथाच्या बरोबर जायचो मी चौफुला)

दूरदेशी आमचा हा घोळ होतो नेहमी
समजतो बाईच आम्ही केशसंभारी मुला

जाहले आयुष्य आहे, आमचे बुजगावणे
बायको सांगेल तैसे या इथे आता डुला

छापकाटा चालला आहे कधीचा हा तिचा
एकदा लागेल नंबर याच आशेवर झुला

हेच होते शेवटी जे आज माझे जाहले
एवढे हासू नका शेकेल तुमचा ही कुला

 तू विडंबन पाडले आहेस भीषण "केशवा"
खैर ना आता, पळाया ठेव दरवाजा खुला