धुर कवितेचे

श्री. प्रदीप कुलकर्णी यांच्या 'विष कवितेचे' वरून

स्वजनांनी मज असे कुरवळायला हवे
मी जगताला अजून पकवायला हवे

पिवळे झाले अजून तितके नसे तुझे..
अजून, थोडे अजून, रगडायला हवे

तुझा डबोला जुनाच आहे, अता तरी..
अजून काही बरेच बरसायला हवे

नासणार ही अशीच बहुधा हयात रे..
मुली मिळाल्यावरी परवडायला हवे

असाच रडला आजवरी अन रडो पुढे..
दमून आला कि पोट बिघडायला हवे

पटली नाही अजून कोणी 'मधमाशी'..
किती जन्म मी उधार 'मध' खायला हवे?

खरोखरी जर मुला, प्रतापी बनायचे..
खिसे जगाचे तुझ्यात मिसळायला हवे

'कल्पनाच' का मिठीत घ्यावी पुन्हा पुन्हा..?
कुणी दुजे का इथे न बिलगायला हवे?

ओतण्यास तू मला न बोलाविले तरी..
तुझे नभाला विमान थडकायला हवे

बनू लागता सपट लोशने गजलांची..
इथे न आता कुल्ल्यांस दुखायला हवे

अमृतमयही सुचेल करुनी 'फुकाफुकी'..
धुर कवितेचे उरात पसरायला हवे

  - राजे विडंबनश्री

================
चिरफाडकाल : २५ एप्रिल २००९
================