पाहिले तुज मी नि तूही पाहिलेस असे मला

पाहिले तुज मी नि तूही पाहिलेस असे मला
की जणू सहवास होता सप्तजन्मी आपला ।ध्रु।

भेटुनी दृष्टीस दृष्टी हरवुनी झणि जातसे
मोहिनी ही करितसे माझ्या मना वेडेपिसे
तू पुढे आलीस अन् हृद्स्पंद क्षणभर थांबला ।१।
पाहिले तुज मी ...

राज्य हृदयाचे अता उदयास येइल जसजसे
प्रेमभावे धुंद हे आयुष्य होइल तसतसे
गोष्ट मग माझी तुझी लागेल जग सांगायला ।२।
पाहिले तुज मी ...

चाल :  गालगागा गालगागा गालगागा गालगा (मूळ गाण्यासारखी नाही)

विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्यावर आधारित भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. कडव्यांच्या शेवटचे शब्द पाहून 'अला' ला यमक जुळवून ध्रुवपदाच्या भाषांतराचे शब्द काय असतील तेही ओळखून काढा.