पवारांच्या ताटाखालचे मांजर

आजच्या सकाळमध्ये मेधा पाटकरांच्या महत्वाच्या पत्रकार परिषदेची बातमी का नाही?

लवासा कॉर्पोरेशनमध्ये पवारांचे हितसंबंध गुंतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आपल्या वाचकांना ही माहिती देण्याची जबाबदारी आपल्यावर नाही असा सकाळचे माननीय मुख्य संपादक यांचा समज आहे का?

अलिकडे सकाळमध्ये अशा पवारांना जड जाणार्या बातम्यांची वारंवार मुस्कटदाबी होत आहे.

७५ वर्षांची परंपरा सांगण्याचा अधिकार अशा वृत्तपत्रास आहे काय?

ही वाचकांची प्रतारणा नाही का ?

मग सामना, प्रहार ही वृत्तपत्रे परवडली. आम्ही ठाकरे आणि राणेंची मुखपत्रे आहोत हे ते बिनधास्तपणे मान्य तरी करतात.

सकाळच्या माननीय मुख्य संपादकांनीही आपलं वृत्तपत्र पवारांच्या ताटाखालचं मांजर असल्याचं जाहीर करुन टाकावंच!

कुणी याचे स्पष्टीकरण देईल काय?

सकाळचे सध्याचे मुख्य संपादक (?) ही शोषितांचा कैवार वगैरे घेणारे असल्याचे सर्वज्ञात आहे,

मग आता लवासामध्ये होरपळणार्या आदिवासींचे अश्रू पुसायची त्यांना भीती वाटते आहे का ?

(काही भाग संपादित : प्रशासक)