पक्षी आणि भिजणे

     अचानक पाऊस पडू लागला की, रेनकोट व छत्री नसलेले लोक कुठेतरी आसरा घेतात. रस्त्यावरचे लोक बंद दुकानाच्या शटरचा आडोसा घेतात. 
    हे पक्ष्यांच्या बाबत दिसत नाही. तुफान पावसातही त्यांचे झाडावरील सर्व कार्यंक्रम निवांत सुरु असतात. आपल्या जवळच एखादी फांदी असेल तर आपल्याला सरळ दिसते की, तो पक्षी चिंब भिजलेला आहे. भांग न पाडलेले जसे केस असतात तशी त्याच्या अंगावरची पिसे झालेली असतात. आडोसा तर दूरच पण तो पक्षी साधा विचलितही झालेला दिसत नाही. पाच-सहा पक्ष्यांनी एखाद्या पाईपलाईनचा आधार घेतला आहे, पाऊस थोडा कमी झाल्यावर एक एक पक्षी उडून आपापल्या मार्गाने उडून जात आहे असे दिसत नाही.
    पक्षी भिजत नाहीत का ?
    अंग कोरडे करणे हा विषय त्यांच्या दैनंदिन जीवनात येत नाही का  ?  
    पक्षीतज्ज्ञांचा काय अभ्यास आहे ?