हाकामारी

वर्षे १९८८ व १९९२.

रात्रीच्या वेळी एक बाई फिरते. वेगवेगळी रुपे घेते. ज्या घरावर तीन फुल्या असतील त्या घराला ती काहीही अपाय करीत नाही. ज्या घरावर फुल्या नसतील, त्या घरातील एखाद्या व्यक्तीचे रुप घेते व दारावर टकटक करते. दार उघडताच ते उघडणारा माणूस तत्काळ गतप्राण होतो, अशी अफवा या दोन वर्षांत पुण्यात पसरली होती. मी जिथे राहत होतो, तिथे तरी हे कानावर आले होते.

या अफवेचा उगम कुठला ?

अशा आणखी काही अफवा त्या काळात कोणाच्या कानावर आल्या होत्या ?