नोकरी/व्यवसायाविषयी सल्ला/मदत हवी आहे.

मी एक गृहिणी आहे. आता माझा मुलगा मोठा झाला आहे. त्यामुळे दिवसाचे ३/४ तास मी मोकळी असते. माझ्याकडे कॉंम्प्यूटर आणि नेटही आहे. मला असा पार्टटाईम जॉब हवा आहे की मी घरी बसून काम करू शकते. मी गुगल वर कीवर्ड टाकून बघितले. तिथे असे जॉब्स आहेत. पण त्यांचा विश्वास धरावा की नाही या पेचात मी आहे. कारण आजकाल सायबर गुन्हे खूप वाढले आहेत. मी फावल्या वेळात काम करून घर खर्चाला थोडी मदत करू इच्छिते . शिवाय माझ्या मुलाला 'सायबर सिक्युरिटी' मध्ये जास्त रस असल्याने त्याला त्या कोर्सला घातले आहे. त्याच्या फीचा भार एकाच्याच पगारावर पडणे जमत नाही. शिवाय मी एक पदवीधर आहे. बाहेर पडून काम करणे शक्य नाही तरी घरून काही करू शकले तर बराच फायदा होईल. मी मनोगतींना विनंती करते की इतक्या मनोगतींमध्ये कोणी कोणी एखाद्या चांगल्या संस्थेत किंवा इतर कुठे चांगल्या ठिकाणी असेलच.तेव्हा मला मदत करू शकाल का? मी भाषांतराचे काम करू शकते. इंग्रजीचे भाषांतर मराठीत करणे मला जमेल. एकदा हे जमले तर पुढे आणखी प्रगती करता येईल. मनोगतींना त्रास देण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे जरी आपण एकमेकांना बघितले नसले तरी मनोगतींबद्दल एक विश्वास वाटतो आहे. कारण एखाद्या विषयावर मनोगती ज्या प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त करतात ते मला आवडते. कोणालाही चुकीचा सल्ला दिला जात नाही.एकाच कुटुंबाचे घटक असल्याप्रमाणे दुसऱ्याच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.  म्हणून मी तुम्हालाच विनंती करते की मला पण मदत कराल का? धन्यवाद.