नाती-गोती

परवा अचानक साडू शब्द ऐकला (शाळेत असताना का कोण जाणे साडू आणि चेंबुरचे वैद्य सांडू एकच वाटायचे). परवा मला कळले की साडू म्हणजे बायकोच्या बहीणीचा नवरा. .... मजा वाटली. मग मेव्हणा, दीर, भावजय, वन्स (हल्ली वन्स कोणी म्हणत नाही ती बाब वेगळी) अश्या अनेक नातेवाचक शब्दांचा धांडोळा घेतला गेला.

बरेच नवे शब्द कळले. जिजाजी हा शब्द मात्र तद्दन अमराठी वाटला. तसेच मावसोबा हा पण शब्द इतर भाषेतून उचलल्यासारखा वाटतो. चु. भु. द्या. घ्या.    

आपण थोडा हातभार लावून ह्या माहितीत भर घालावी ही वि. वि.