मिश्र भाज्यांचे सूप

  • कोबीची पाने १०-१५ (बाहेरची पाने सुद्धा चालतात), पालक २ पाने, गाजर व बीट छोटे तुकडे दोन्ही मिळून पाऊण वाटी,
  • १ मध्यम बटाटा, १ छोट कांदा, २ टोमॅटो.
  • धने-जिरे पूड १ चमचा प्रत्येकी, साखर, मीठ, मिरेपूड पाव चमचा, लाल तिखट ( चिमूटभर)
१५ मिनिटे
४ माणसे

१) सर्व भाज्या जाडसर चिरून एकत्र  वाफवून घ्याव्यात.

२) मग वाटणयंत्रातून (मिक्सर) वाटून  घ्याव्यात.

३) मग मिश्रण सरसरीत होईल इतके पाणी घालून गॅसवर उकळायला ठेवावे.

४) धने-जिरे पूड , चवीपुरते साखर + मीठ, मिरेपूड , लाल तिखट घालावे.

५) गरम गरम प्यावे. प्यायला घेतांना त्यात थोडे लोणी घ्यावे.

अजूनही कुठल्या भाज्या, कडधान्ये घालता येतील.

चविष्ट 'डाएट' सूप आहे. ( लोणी न घातल्यास ) :)

बटाटा असल्याने कॉर्नफ्लोअर ची गरज पडत नाही.