कारची काळजी कशी घ्यावी?

मी नुकतीच एक सेकंडहॅंड मारुती ८०० ही कार घेतली आहे. चालक म्हणूनसुद्धा मी नवीन आहे. कारचा परफॉर्मन्स (ह्यामध्ये मला चांगले ऍव्हरेज व कमीत कमी देखभाल अपेक्षीत आहे) जास्तीत जास्त चांगला राहावा ह्यासाठी काय काय काळजी घ्यावी ह्याची माहिती मी गोळा करतोय. तर ह्याबाबतीत चांगली माहिती देणारे एखादे संकेतस्थळ मनोगतींनी सुचवावे.

मनोगतींमध्ये कोणी चारचाकीचे पंखे असतील त्यांनी मोलाचे सल्ले दिले तर माझ्यासारख्या नवख्याला मदत होईल. 

नमुन्यादाखल माझे काही प्रश्न खाली देत आहे.

१. हायवेवर कारचा वेग जास्तीत जास्त किती ठेवावा जेणे करून इंजिन जास्त गरम होणार नाही.
२. प्रत्येक चाकांत हवेचा दाब किती ठेवावा? (पुण्यात सर्रास ३० इतका ठेवतात)
३. कुलंट व इंजिन ऑइल नेहमी कोणत्या कंपनीचे वापरावे?
४. पुण्यासारख्या शहरात जिथे दर मिनिटाला ब्रेक दाबावे लागतात व गियर बदलावे लागतात, तिथे क्लच व ब्रेकची देखभाल कशी करावी?
५. ब्रेक दाबताना क्लच दाबावा का? (मी खूपवेळा ऐकले आहे की ब्रेक दाबताना क्लच दाबू नये.)
६. मी असे ऐकले आहे की जास्त वेगात असताना कार ब्रेकपेक्षा गियरवर चांगली कंट्रोल होते. हे खरे आहे काय? त्यामुळे गियरवर काही परिणाम होत नाही काय?
७. तसेच काही छोट्याछोट्या गोष्टींची काळजी आपण घेऊ शकतो काय जेणेकरून सारखे मेकॅनिककडे पळावे लागणार नाही.