एकच गॅस जोडणी!

सरकारच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते? सरकारने कारण दिले आहे की गरजूंना गॅस जोडणी देण्यासाठी सिलेंडर कमी पडत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. गरजूंना गॅस जोडणी मिळालीच पाहिजे ह्याबद्दल दुमत नाही. पण त्यामुळे इतर गरजूंना का वेठीला धरता?   हे म्हणजे एकाच्या तोंडाचा घास काढून दुसऱ्याला देण्याचा प्रकार झाला.

१.  ज्या घरात पती -पत्नी व त्यांची विवाहित मुले राहत आहेत ते एकच कुटुंब मानण्यात येईल व त्यांना एकच गॅस जोडणी देण्यात येईल.

- सरकारच्या ह्या कलमामुळेअश्या कुटुंबाला गॅसबाबत केवढी गैरसोय सहन करावी लागेल? ह्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीत राहणारे विभक्त कुटुंब पद्धतीकडे वळतील. त्यामुळे त्या कुटंबाला अनावश्यक खर्चाला तोंड द्यावे लागेल.(अवांतर : आजकाल विजेअभावी गॅस गिझर वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एकापेक्षा जास्त जोडण्या गरजेच्या आहेत. )

३. भ्रष्टाचाराचे नवीन कुरण तयार होईल. ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त जोडणी आहे त्यांना ते टिकविण्यासाठी संबंधीत अधिकाऱ्याचे हात ओले करण्यावाचून गत्यंतर नाही.

कायदेशीर घरगुती गॅसधारकांना वेठीला धरण्यापेक्षा खालील उपाय करता आले असते.

१. बेकायदेशीर गॅस जोडणी शोधून ते बंद करणे.
२. हॉटेलचालकांकडील गॅस सिलेंडर तपासणे. ज्या हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडर सापडेल ते जप्त करणे व त्या हॉटेल चालकास जबर दंड करणे. तसेच घरगुती गॅस सिलेंडर हे फक्त घरांसाठीच वापरले जातील ह्याकडे कटाक्षाने लक्ष देणे.
३. जास्तीत जास्त २ गॅस जोडणी एका कुटुंबाला देणे.
४. ज्या कुटुंबाला एकापेक्षा जास्त जोडण्या पाहिजेत त्यांच्या एका जोडणीवरील अनुदान रद्द करणे व संपूर्ण शुल्क आकारणे.

मलातरी वरील प्रमाणे वाटते. तुम्हाला काय वाटते?