२०२० साल कसे असेल ? तोडा आपल्या अकलेचे तारे

  सुधीर फडके यांचे गाणे लागले होते " बलशाली भारत होवो-----" म्हणून विचार करू लागलो कसे असेल २०२० साल ? तेव्हा माझ्या अकले तारे तुटू लागले ( स्पार्क्स" ) ते असे

१-२०२० साली गरीब फक्त पुस्तकात वाचायला मिलतील, कारण सध्याचे अर्धे अधिक गरीब महागाई मुले मरून गेले असतील आणि उरलेले श्रीमंत न लुटून खंडणी घेऊन आपली गरिबी घालवून बसलेले असतील.
२- मुंबै चे परत बंबै झाले असेल कारण ७० टक्के लोकसंख्या उत्तर प्रदेशियन ची असेल मराठी माणूस पुणे / नाशिक/अलिबाग च्या पलीकडे गेला असेल.
३- कोथिंबिरी ची एक काडी एक रुपया ला असेल --- मागे एका मराठी सिनेमा मध्ये कोथिंबिरींची काडी दहा पैसे दाखविली होती तेव्हा आपण हसलो होतो पण आता पाच रुपया मध्ये पन्नास काड्या येतात का? त्याच सिनेमा मध्ये चोर पाणी चोरतो असे दाखवले आहे --तीही परिस्थिती दूर नाही
४-एक रुपयाचे नाने नाहीसे झाले असेल , दुकानदार नाराजी ने पाच चे नाणे घेतील.
५-पहिली दुसरी पासून कॉम्प्युटर शिकावा लागेल
६-शेअर बाजारचा निर्देशांक ५०००० वर असेल
बघा तुम्हाला काही तारे तोडता येतात का ते ?