मला छळणारी दोन माणस

राजवाड्याजवळच्या नगरवाचनालयात जायचो ... चांदोबा , चंपक वाचायचा तो छंद व्यसन कधी बनला कलालेच नाही मग चांदोबा चंपक ची जागा ययाती म्रुत्युंजय , स्वामी  ने कधी घेतली कळालेच नाही ...राजा शिवछत्रपती वाचताना बाबासाहेबान्ना भेटलो ..रणजीत देसाई नि माधवरावांची ओळख करून दिली .... व्यक्ती आणि वल्ली च्या निमित्तने पुल शी ओळख झाली .. आणि अशाच एका संध्याकाळी , वाचनालयातील पुस्तक चाळताना माझी गाठ या दोन माणसान्शी ओळख झाले एक  ग्रेस आणि दुसरे जी ए . तेव्हा पासून आज तागायत ही माणसे मला छळत आहेत . ( माझ्या सारखे काही  समदुखी येथे असतिल अस वाटल ... म्हणून  चर्चा करावी अस म्हणल... )

ग्रेस : यांची कविता मला नेहमीच बाउनसर गेली , " पाउस कधीचा पडतो झादांची हलती पाने हलकेच जाग मज आली  दुखाच्या मंद सुराने "
 अरे काय हे ?? कविला नक्की काय म्हणायचय ??  मला तर पाउस म्हणल कि घाणीत घाण चिखल आठवेल पन तो ही आम्ही एंजोय करतो ..... सखी सोडुन गेली असेल तर पावसाळा वाटेल थोडा दुखी पण इथे तेही नाही .... मग दुखाच्या मंद सुराने हे काय ???  काही कळत नाही बुवा .
 " भय इथले " थोडफार कळत होती पण त्यात ही मध्ये मध्ये गोंधळ झालच ..झाडाशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया " अरे काय अर्थ काय याचा ??

जी ए .: मित्रान एकदा असच पुस्तक हातात ठेवल म्हणाला " फक्त ' विदुषक ' वाच " .
विदुषक वाचल अन झपाटलाच गेलो  काय भयंकर( भन्नाट या अर्थाने )  लिहितो हा माणुस !!

रक्त्चंदन्ची अर्पण पत्रिका ...बापरे ... कस काय  सुचत असेल हे ??? 

( " कळत नाही " ही सर्वस्वी माझी असमर्थता आहे ..... मी समीक्षक नाही टीकाकार तर मुळीच नाही .  )

येथे बरेच असतील ज्याना ही दोन माणस नीट कळाली असतील ... त्यानी माझीही नीट ओळखकरून द्यावी  ही विनंती ...त्या साठीच ही चर्चा .....