ह्यासोबत
मध्येच पाऊस कमी व्हायचा. कमी झाला की पागोळ्यांचा आवाज यायचा. मग बाहेर पडलेल्या पाला पाचोळ्यावर पाण्याचा '' टर्रर र र....... टप टप...... टर्रररर...... टप.... आवाज व्हायचा. तोही त्यांना विचलित करू लागला.थोड्यावेळाने पावसाने पुन्हा धिंगाणा घालायला सुरुवात केली. एका जागी बसून त्यांना तासभर तरी झाला असावा. समोरच्या घड्याळात पाह्यलं , जवळ जवळ नऊ वाजत आले होते. डॉक्टर आता येतीलच. पुन्हा चुकीचं वेळेच गणित त्यांना आशा दाखवू लागलं. ठाण्याहून यायला तीनचार तास सहज लागतील हे त्या विसरल्या. कोणाचाही फोन नाही. काही नाही्. हळू हळू त्या भिंतीच्या बाजूने सरकत सरकत किचनमध्येगेल्या. पाण्याचा जग शोधून थोडं पाणी प्यायल्यावर त्यांना जरा बरं वाटलं. चिरलेला पालक चाळणीत तसाच पडून होता. ताटलीत काढलेल्या पनीरच्या तुकड्यांना आता पाणी सुटलं होतं. त्या पुन्हा दबकत दबकत हॉलमध्ये आल्या. जणू काही विनायक्ररावांची झोप मोडली असती.कसंतरी सोफ्यावरच्या खुर्चीत त्यांनी अंग टाकलं. जरा वेळानी त्या घड्याळाकडे पाहू लागल्या. पण त्यांना ते थिजल्यासारखं वाटलं. नऊवाजत होते. अशी मिनटं मिनटं वाट पाहण्याची त्यांना अजिबात सवय नव्हती. त्यांच्या आयुष्यात जे काही व्हायचं ते फटाफट व्हायचं. आणि सोबत यशही यायचं. फार कशाला , आत्ता जे काही झालं तेही फटाफटच झालं . पण त्याला जोडून यश मात्र आलं नव्हतं. विचार करून त्यांचंडोकं दुखायला लागलं.घड्याळात नऊचे ठोके पडू लागले. पहिल्याच ठोक्याला त्या केवढ्या घाबरल्या. अंगावरची शाल घट्ट आवळून त्यांनी डोळेमिटून घेतले. मग त्यांना इतक्या वेळच्या शिणामुळे म्हणा किंवा ताणामुळे म्हणा, पेंग आली . ग्लानीसारखी झोप लागली . त्यात त्यांना स्वप्नपडलं....
स्वप्नात त्या एका कड्यावर उभ्या होत्या. बाजुला खोल दरी होती. विनायकराव दरीच्या बाजूला तरंगत होते. ते म्हणत होते, '' रत्ना , अगं मी जरा कुठे बाहेर फिरायला गेलो तर किती घाबरलीस तू ? रडतेस काय? वेडी कुठली. येईन मी लवकरच. '' आणि ते खळाळून हसत वाऱ्यावर निघुनही गेले. रत्नाबाई खडबडून जाग्या झाल्या. कपाळावरचा घाम टिपत त्या बराच वेळ स्वस्थबसल्या. त्यांना परत एकदा डाँ. ना फोन करावासा वाटला. जड अंतःकरणाने त्या उठल्या आणि त्यांनी फोन उचलला. डायलटोन जेमतेमचयेत होता. नंबर फिरवला, तर ''बरररर...... फुर्र र्रर्रर्रर्र.... चिर्रर्रर्ररररर..... असले आवाज येऊ लागले. मग कसंतरी डाँ. नि फोन घेतल्याचे त्याना जाणवले. '' हॅलो.. हॅलो..... फुर्रर्र.. मी ..... बर्रर्रर्र... पायात ... चिर्रर्रर्र.... अडकलोय....... फुर्रर्र..... आवाज जास्तच वाढला.कंटाळून रत्नाबाईंनि फोन ठेऊन दिला. हे काय उत्तर आहे ? मी पायात अडकलोय ? नक्की काय आहे? मग त्यांच्या दमलेल्या मेंदूला अर्थलागला.'' पाण्यात अडकल्येत वाटतं.'' त्या पुटपुटल्या. याचा अर्थ सगळीकडे पाऊस पडतोय म्हणायचा. बाप रे... म्हणजे आता इथे अजूनमी एकटीनी किती तास काढायचे ? मध्येच त्यांची भीती थोडी कमी झाली. गणपती पुढची समई केव्हाच विझली होती. त्यांनी तसबिरीकडेपाह्यलं. त्यांच्या मनात आलं . म्हणजे गोड बातमीच्या बदल्यात वाईट.... ̱घटना? आपला देवावर काहीच हक्क नाही, असं त्यांना वाटलं.आपण क्धी देवदेव केलंच नाही. ना आपण देवभोळेपणा केला. जे आहे ते वास्तव आपण बुद्धीच्या कसोटीवर घासून स्वीकारत गेलो. विनायकरावहो तसेच होते. पण आपण देवदेव करणाऱ्यांना कधी नावही ठेवली नाही . त्यांची आई देवाचं फार करायची. वडील मात्र तिची चेष्टा करायचे. एकटीने बसून आता वेळ तरी कसा काढायचा? त्यांनी स्वेटर विणायला घेतला होता तो त्यांनी टेबलाच्या खणातून काढला.त्या पुन्हा खुर्चीत बसल्या.
मग त्यांना काय वाटलं कोण जाणे. त्यांना श्रीकांतला फोन करावासा वाटला. पण लँडलाईनवर ''ही सुविधा आपल्या फोनवर उपलब्ध नाही. ''असं उत्तर आलं. मोबाईल काय आऊट ओफ रेंजच होता. त्यानी स्वेटर विणायला सुरुवातकेली . सुमारे अर्धा तास त्या विणत होत्या. पिंगत आणि निळसर रंगाच्या लोकरीचे धागे यांत्रिकपणे पुढे सरकत होते. आता त्यांना त्या ''डेड बॉडीची '' सवय झाली. पण एक गोष्ट नक्की होती की थोड्या थोड्या वेळानी नजर सोफ्यावर पडलेल्या विनायकरावांकडे जात होती. काही वेळानी त्यांना विणण्याचाही कंटाळा आला. त्या डोळे मिटून बसून राहिल्या. मध्येच वीज चमके. आणि कुठेतरी ती पडल्याचा''धडामधूम धड धड''असा आवाज होई. पाऊस ''अगदी सिन्सीयरली '' नाईट ड्यूटी करीत होता. मध्येच पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. बाहेरजणू पाऊस , रात्र आणि वीज मन मुराद खेळत होते . खिडक्यांमधून दिसत काहीच नव्हतं.आणि बघणार तरी कोण होतं ? एरव्ही ते सर्ववातावरण मादक वाटलं असतं. कुठून तरी , कदाचित वरच्या बाजूने वारा घरात शिरत होता. काय माहित? बाल्कनीचा दरवाजा उघडा होता तिथून तो शिरत असावा . पण रत्नाबाईंना वर जाऊन बाल्कनीचा दरावाजा बंद करण्याचा धीर झाला नाही. मग त्यांनी घड्याळाकडे पाहिलं. सव्वाबारा होत होते. पुन्हा एकदा त्यांच्या अंगातून भीती ची लहर गेली. आणि आपण इथे एकट्याच अस्ल्याची त्यांना जाणीव झाली. त्यांच लक्ष नकळत विनायकरावांकडे गेलं. मग त्यांना एक वेगळीच गोष्ट दिसली . विनायकरावांच्या उघड्या तोंडाच्या उजव्या कोपऱ्यातून एक लालसर द्रव वाहत येत होता. आणि त्याच बरोबर काहीतरी हालणारं, ओंगळवाणं, दिशाहीन हालचाल करणारं, लोकरीच्या रंगाचं बाहेर येत होतं. त्यानकळत जवळ जाऊन पाहू लागल्या. त्यांचे डोळे भीतीने विस्फारले गेले. करड्या पिंगट रंगाचा वळवळणारा किडा लहानसाच होता. जेमतेम बोटाच्या पेराएवढा. त्यांच्या तोंडावर तो रेंगाळत होता. त्यांनी पटकन हातातली लोकर अर्धवट विणलेल्या अवस्थेत टाकून दिली. आणि तोंडाशीयेणारी मळमळ पदराने दाबली. त्यांना भयंकर किळस आली. मग त्यांना आपण काय पाहतो आहोत याची जाणीव होऊन , भीतीने किंकाळीफोडली. त्यांची किंकाळी ऐकायला होतच कोण ? त्या शुद्ध हरपून सोफ्याच्या खुर्चीजवळ पडल्या. घड्याळात एक वाजून गेला होता. मध्येचएकदोन वेळा फोनची बेल वाजली. पण त्या शुद्धीत होत्याच कुठे? आणि फोनवरून काही ऐकू तरी येणार होतं कां? कोण होतं ते ?.... डॉक्टर?....... का श्रीकांत ? ..... का आणखी कोणी ? जवळ जवळ अर्धा पाऊण तास त्या बेशुद्धीत होत्या. हळूहळू त्या शुद्धीवर येत होत्या. त्यांना प्रथम आवाज आला वीज पडल्याचा. मग डोळे उघडता उघडता प्रकाशाची सवय करून घेतली. प्रकाश पूर्वी एवढाच होता.
त्यांनी तोंडावर पदर दाबून लांबूनच विनायकरावांकडे पाह्यलं. मघाशी एकच वळ वळ दिसत होती.आता त्यांना बऱ्याच लहान लहान वळवळी दिसू लागल्या. बरोबर लालसर लाळही बाहेर येत होती. आत काही तुटलं फुटलं असेल कि काय?त्या घाबरून मागे मागे येत होत्या. मग त्यांना वाटलं बॉडी '' डि टि रि ऑ रे ट "होत होती की काय ? त्यांनी असं वाचलं होतं. पण त्रयस्थपणाने असं वाचणं आणि आपल्याच माणसाच्या बाबतीत असं घडणं यात फरक होता. आता त्या फ्रंट डोअरशी आल्या आणि त्यांनी एकाकोपऱ्यात बसकण मारली. आत शिरणाऱ्या वाऱ्याने विनायक्ररावाच्या अर्धवट उघड्या पापण्याही हालत होत्या. जणू काही ते जिवंत होते. बाप रे हे काय आणखीन ? त्यांच्या मनात आलं. आपण इतक्या वेळात लक्षात आल्याबरोबर त्यांचे डोळे मिटले असते तर बरं झालं असतं.मध्येच घड्याळात दोन ठोके पडले. कसंतरी बळ धरून त्या विनायकराव पडले होते सोफ्याच्या मागे अस्लेल्या वॉर्डरोब कडे जाऊ लागल्या. त्यात चादरी होत्या. एखाद चादर त्यांच्या डोक्यावरून घातली असती तरी पुढचं काही दिसणार तरी नाही या विचाराने त्या सोफ्यामागे आल्या.
त्यांनी वॉर्डरोब उघडण्यासाठी हात वर उचलला आणि तेवढयात दरवाजावरची बेल वाजली . सबंध गूढ वातावरणाचा भंग करणारी बेल. खरं तर तिचा आवाज अगदीच वाईट नव्हता. एरव्ही भीती वाटलीच नसती. पण त्या दचकून मागे सरकल्या.दरवाजा बाहेर कोण आहे ? त्यांना थरथर सुटली. त्यांना आपल्या भीतीचा रागही आला. रागाने भीती जरा दबली. मग त्यांनी बिचार केला. कोणीका असेना . मी त्याला सगळं सांगीन . पण कोण आहे विचारणारे शब्द काही त्यांच्या तोंडून बाहेर आले नाहीत. त्यांनी विचारायच्या आतच बाहेरून आवाज आला. ''मी , डॉक्टर शिधये. रत्नावहिनी दार उघडा लवकर. "' वहिनींनी सुटकेचा निश्वास सोडला. थरथरत त्यांनी भिंतीचा आणि सोफ्याचा आधार घेत दरवाजा उघडला. दारातून डॉ. आत आले. ते भिजले होते̮ त्यांच्यामागे दोन माणसंही होती. कदाचित त्यांचे मदतनीस असतील असं वहिनींना वाटलं. डॉ. सरळ विनायकरावांकडे गेले. दुसरे दोघे दाराजवळच रेंगाळत होते.थोड्या वेळाने ते दोघेही आत आले. डाँ . नि वेगवेगळे प्रयत्न करून पाह्यले. मग खात्री झाल्यावर, त्यांन प्रथम बॉडी साफ केलीं . नाका तोंडात बोळे घातले.काही औषधं लावली. त्यांचा हॉल मध्ये वास पसरला. मग बॉडी आलेल्या दोघांच्या मदतीने त्यांनी व्यवस्थित पॅक केलि. आणि ते आत गेले. रत्नाबाई आत होत्या. त्यांना म्हणाले, "श्रीकांतला फोन लागला का? '' त्या नाही म्हणाल्या . ते पुढे म्हणाले, ''सात आठ तास उलटून गेलेले आहेत. बॉडीचीअशी अवस्था होते कधी कधी. तुम्ही धीरानं या सगळ्याला तोंड दिलत, खरच कमाल आहे तुमची. झालं ते वाईटच झालं . मला तुम्ही तरी सांगायच ना कुठे जाणार आहात ते. नेहेमी सगळं सांगतो हा . यावेळेला कसा विसरला ? रत्नाबाईंच्या डोळ्याला धार लागली. म्हणाल्या, '''सगळंआयुष्य नीट गेलं हो. पण हे कसं झालं काही कळलच नाही. '' डॉ . नि समजाबले, '' आपल्या हातात या गोष्टी नाहीत्. हा सगळा परमेश्वराचा खेळ आहे. आता मी काय सांगतो ते ऐका. तुम्ही अगदी स्वस्थ राहा. मी आधी तुमच्यासाठी कॉफी करतो. ती घ्या. तुम्हाला त्याची गरज आहे. माझ्या बरोबर दोघेजण आहेत ते गाडी घेऊन गावात जातील. पुढची व्यवस्था करतील. तो पर्यंत मी श्रीकांतला फोन करतो. ''
वहिनींची समजुत काढता काढता त्यांना गोड बातमीही समजली. त्यांना परमेश्वरी खेळाचं आश्चर्य वाटलं. त्या दोघांना सूचना देऊन त्यांनी गावात पाठवलं. उरलेली रात्र बसून काढावी लागली. सकाळ झाली. पाऊस पूर्ण थांबला होता. चकचकीत कोवळ्या उन्हाने सगळं जंगल , डोंगरमाथे उजळून निघाले. नैसर्गिक सौंदर्याची नुसती लयलूट होती . पण त्याचं कौतुक कोण करणार? श्रीकांतला फोनलागला. त्यावर तो म्हणाला , ''लवकरात लवक्रर म्हंटलं तरी चार पाच दिवस लागतील. मी आईशी काय बोलणार ? '' विनायकरावांना तीन भाऊ होते. पण एक नागपूरला, एक अमरावतीला आणि तिसरा भोपाळला.. पण डॉक्टर म्हणाले की सध्या कोणाकरताही थांबता येणार नाही.लवकरात लवकर बॉडी डिस्पोझ केली पाह्यजे. सकाळी आठ वाजे पर्यंत अंब्युलन्स आली. काही माणसंही आली. बॉडीघेऊन ते गेले. मग डॉक्टर रत्नाबाईंसाठी थांबले. त्यांनी कशी तरी सगळी आवरा आवर केलि. आणि बंगल्याला कुलुप लावून निघाल्या. त्यांनी मागे देखील वळून पाह्यल नाही.
(सं पू र्ण )