प्रहेलिका

काही दिवसांपूर्वी मी एक सुभाषितांचा ब्लॉग चालू केला होता. त्यामध्ये आता मी काही प्रहेलिका प्रसिद्ध करत आहे. त्याचे उत्तर इथे देण्यास हरकत नाही.

अपदो
दूरगामी च साक्षरो न च पण्डितः |

अमुखः स्फुटवक्ता च यो जानाति स पण्डितः ||

अर्थ

[प्रहेलिका म्हणजे कोडं या प्रकारचा हा श्लोक
आहे ]

पाय नसून दूरदूर जातो. साक्षर असला तरी विद्वान नाही. त्याला तोंड तर
नाहीच. पण सर्व गोष्टी सविस्तर सांगतो. जो ओळखेल तो ज्ञानी आहे.

चला द्या बरे उत्तर ह्याचे. मला खात्री आहे अनेकांना ह्याचे उत्तर येईल.