प्रहेलिका ३

वृक्षाग्रवासी न च पक्षिराजस्त्रिनेत्रधारी न च शूलपाणिः |
त्वग्वस्त्रधारी न च सिद्धयोगी जलं च बिभ्रन्न घटो न मेघः ||

असा कोण ते ओळखा?

अर्थ
झाडाच्या शेंड्यावर राहतो पण पक्षिश्रेष्ठ नाही. तीन डोळे आहेत पण शंकर नाही. वल्कलं परिधान केली आहेत पण तापसी नाही. पाणी बाळगतो पण घडा किंवा ढग नाही.
(अर्थ पाहण्यासाठी मूषकाचा दर्शक वरील ओळींवर ओढून त्या ओळी निवडाव्या.)