प्रहेलिका ४

सर्वस्वापहरो न तस्करगणो रक्षो न रक्ताशनः सर्पो नैव
बिलेशयोऽखिलनिशाचारी न भूतोऽपी च |

अंतर्धानपटुर्न सिद्धपुरुषो
नाप्याशुगो मारुतस्तीक्ष्णास्यो न तु सायकस्तमिह ये जानंती ते पण्डिताः ||

अर्थ

सर्वस्वापहर
आहे, पण चोरांची टोळी नाही. रक्त पितो, पण राक्षस नाही. बिळात राहतो, पण
साप नाही. सगळी रात्र भटकतो, पण भूत नाही. पटकन अदृश्य होतो, पण सिद्ध
पुरुष नाही. वेगात धावतो, पण वारा नाही. चावा तीक्ष्ण आहे, पण बाण नाही.
ओळखतील ते ज्ञानी.. :)

(अर्थ पाहण्यासाठी मूषकाचा दर्शक वरील ओळींवर ओढून त्या ओळी निवडाव्या.)