पूर्वी आवडत्या मुलीने नकार दिला तर मुले आत्महत्या करीत असत.
आवडत्या मुलाने नकार दिला तर मुली आत्महत्या करीत असत.
आत्महत्या करण्याची हिंमत नसेल तर विमनस्क अवस्थेत किंवा अत्यंत नाइलाजाने दुसऱ्या मुलीशी किंवा मुलाशी लग्न करून पण पूर्वीच्या आठवणी मनात ठेवूनच जीवन कंठणे हा पर्याय स्वीकारला जात असे.
निष्ठा, त्याग या भावना मोठ्या प्रमाणात होत्या.
जागतिकीकरणानंतर चित्र बदलले असून 'तू नाहीस तर दुसरी किंवा दुसरा मिळेल. कोणीतरी मला 'उपलब्ध' होईलच.' हा दृष्टिकोन बळावला आहे. निष्ठा फारशी ठेवली जात नाही, असे चित्र आहे.
प्रेमाचे नाते व्यावहारिक पातळीवर आले आहे.
जागतिकीकरणाचा नात्यांवरचा परिणाम कसा उलगडवून दाखवता येईल ?